मनोरंजन

‘छावा’च्या सेटवर शूटिंगनंतरही विकी कौशल अनेक तास का थांबायचा

सध्या विकी कौशलच्या ‘छावा’ची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ‘छावा’चा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. तेव्हापासूनच मोठ्या पडद्यावर ‘छावा’अनुभव घेण्यासाठी फॅन्स उत्सुक आहेत. ‘छावा’ सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या सिनेमात विकी संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारतोय. ‘छावा’च्या सेटवर शूटिंग झाल्यावरही विकी कौशल पुढे अनेक तास बसून राहायचा. काय होतं त्यामागचं कारण?

‘छावा’च्या सेटवर विकी कौशल का थांबायचा?

‘छावा’च्या सेटवर विकी कौशलच्या सहकलाकाराने ही खास गोष्ट सर्वांना सांगितली. विकी कौशल ‘छावा’च्या सेटवर संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घ्यायचा. शूटिंग झाल्यावरही विकी कौशल सेटवरच पुढे अनेक थांबायचा कारण त्याला इतरांची मदत करायची इच्छा होती. याशिवाय शूटिंगच्या वेळी सहकलाकारांना संवाद बोलण्यासाठी याशिवाय इतरही गोष्टींसाठी तो सहाय्य करायचा. विकीच्या या स्वभावाचं सगळीकडे कौतुक होतंय.
‘छावा’ रिलीज कधी होणार?

विकी कौशलचा ‘छावा’ नेमका कधी रिलीज होणार याचा अंदाज लावणारा एक मीडिया रिपोर्ट समोर आलाय. सुरुवातीला ६ डिसेंबरला रिलीज होणारा ‘छावा’ पुढे ढकलून २० डिसेंबरला रिलीज होण्याची शक्यता होती. २० डिसेंबरला नाना पाटेकर-अनिल शर्मा यांचा ‘वनवास’ सिनेमा रिलीज होणार आहे. त्यामुळे ‘छावा’चं प्रदर्शन थेट पुढील वर्षी ढकलण्यात आलं असून नवीन वर्षात १० जानेवारी २०२५ ला ‘छावा’ सिनेमा रिलीज होऊ शकतो. ‘पुष्पा २’ मुळे ‘छावा’च्या रिलीजची डेट पुढे ढकलण्यात आल्याचं बोललं जातंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Prove your humanity: 1   +   1   =