मनोरंजन

असं काय घडलं की राधिका आपटेनं या सुपरस्टारच्या लगावली मुस्काटात

अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिने विविध भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ती सिनेइंडस्ट्रीत बेधडक अंदाजासाठी ओळखली जाते. एका साउथच्या चित्रपटाच्या शूटिंगवेळी तिने एका सुपरस्टारला सणसणीत सपराकदेखील मारली होती. एका मुलाखतीत खुद्द राधिका आपटे हिने याचा खुलासा केला. तिने सांगितले की, त्या अभिनेत्याच्या वर्तणुकीमुळे तिचा संताप अनावर झाला आणि ती स्वतःला थांबवू शकली नाही.

राधिका एका तमीळ सिनेमात काम करत असताना हा प्रसंग घडला होता. ती म्हणाली, सेटवर माझा पहिला दिवस होता. पण एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने माझ्या पायाला गुदगुदल्या करायला सुरुवात केली. मी चकीत झाले. चित्रपटाच्या आधी आम्ही कधीच भेटलो नव्हतो. तरीही तो अभिनेता असा प्रकार कसा काय करु शकतो? मी त्याच वेळी त्याच्या थोबाडीत मारली. राधिका आपटेने हा किस्सा नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये सांगितला होता.

वर्कफ्रंट
२००५ मध्ये राधिकाने वाह, लाईफ हो तो ऐसी या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले होते. यानंतर शोर इन द सिटी, कबाली, बदलापूर, मांझी- द माऊंटेन मॅन अशा अनेक चित्रपटांत राधिका दिसली आहे. हिंदी चित्रपटांशिवाय राधिकाने मराठी, तेलगू, तामिळ, मल्याळम चित्रपटातही काम केले आहे. राधिकाला खरी ओळख शोर इन द सिटीमधून मिळाली आहे.

अभिनेत्री लवकरच देणार गुड न्यूज
राधिका आपटे सिस्टर मिडनाईट या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाच्या प्रिमियरदरम्यान राधिकाने आई होणार असल्याची गुडन्यूज सगळ्यांसोबत शेअर केली आहे. या फिल्म फेस्टिव्हलसाठी राधिका काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसून आली. यावेळी लक्ष वेधून घेतलं ते तिच्या बेबी बंपने. रेड कार्पेटवर बेबी बंप फ्लॉन्ट करत राधिकाने आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Prove your humanity: 8   +   6   =