मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात रस्त्याच्या कडेला असलेल्या गर्डरवर ट्रक आढळून अपघात झाल्याची घटना शनिवारी घडली होती. त्यापाठोपाठ रविवारी सकाळी पुन्हा भीषण अपघात झाला. एसटी बस, कंटेनर, कार, व दुचाकीची एकमेकांना धडक लागून हा अपघात घडला. यामध्ये एसटी चालकासह एक प्रवासी जखमी झाला आहे. सलग दोन अपघातांमुळे परशुराम घाटातील अपघातांची मालिका सुरूच राहिली आहे. […]