चंदूर (ता.हातकणंगले) येथील यंत्रमाग कारखान्यात वीज जोडणी करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. लाईनमन रज्जाक हुसेन तांबोळी (वय ५०, रा. भारतनगर मिरज) याला रंगेहात पकडले, तर बाह्यस्त्रोत कर्मचारी आकाश शंकर किटे(३३, रा.धुळेश्वरनगर कबनूर) याला गुन्ह्यातील सहभागाबद्दल ताब्यात घेतले. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला. चंदूर […]