धाराशिव

शरद पवार : मी अजून म्हातारा झालो नाही

देशात बदल घडवून आणण्यासाठी आम्ही इंडियाच्या झेंड्याखाली एकत्र आलो आहोत. त्यामुळे बाबासाहेबांचे संविधान आपण सर्व जण वाचवू शकलो. अगदी तसेच महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी राज्यात सत्ता परिवर्तन आवश्यक आहे. मी काही अजून म्हातारा झालो नाही, परिवर्तन घडवून आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही खा. शरद पवार यांनी रविवारी परंडा येथील सभेतून दिली. परंडा मतदारसंघात यावेळी […]