महाराष्ट्र सरकारने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचे शुल्क पूर्ण किंवा अंशतः परत मिळते. यामुळे त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुलभ होत आहे आणि त्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत होत आहे. Chhatrapati Shahu Maharaj Scholarship छत्रपती राजर्षी उच्चशिक्षण संचालनालय महाराष्ट्र सरकार यांनी पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना 2024 सुरू केलेली आहे. या शिष्यवृत्तीचा उद्देश म्हणजे राज्यातील आर्थिक दृष्ट्या कुमकुवत वर्ग EWS वर्गातील अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ट्युशन आणि चाचणी खर्चाची 100% रक्कम परतफेड केली जाते. महाराष्ट्र सरकार राज्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते. या योजनेचा भाग म्हणूनच राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजना Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Scholarship सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना होत आहे.आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण Rajshree Shahu Maharaj Scholarship राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजना म्हणजे काय?, या योजनेचा कोणाला लाभ होतो?, या योजनेसाठी कोण पात्र आहे? या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे हा राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेचा मुख्य उद्देश आहे.
Chhatrapati Shahu Maharaj Shishyavrutti राजर्षी शाहू योजनेच्या माध्यमातून शालेय परीक्षेत 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आणि इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना दरमहा 300 रुपये प्रमाणे या योजनेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. (10 महिने- प्रत्येकी 11 वी आणि 12 वी साठी) ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती आणि फेलोशिप व्यतिरिक्त देण्यात येते.
Rajarshi Shahu Maharaj Shishyavrutti महाराष्ट्र सरकारचे उच्च शिक्षण विभाग राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती देत आहे. यामुळे या प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊन उच्च शिक्षण घेऊ शकतील. विद्यार्थ्यांना ते घेत असलेल्या उच्च शिक्षणासाठी लागणारी संपूर्ण रक्कम 100% या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप साठी अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र, मागील वर्षाच्या आर्थिक उत्पन्न प्रमाणपत्र आणि अन्य कागदपत्रे आवश्यक आहेत. राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीची अंतिम मुदत यावर्षीची 31 मार्च 2024 होती.
Rajshree Shahu Maharaj Scholarship Yojana In Short
योजनेचे नाव | राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजना |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
उद्देश | विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे |
लाभ | प्रति महिना 300 रुपये |
लाभार्थी | अकरावी बारावी मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://mahadbt.maharashtra.gov.in/ |
राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेचा उद्देश
Rajshree Shahu Maharaj Scholarship Purpose
- Rajshree Shahu Maharaj Scholarship योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन त्यांची शिक्षणाबद्दलची आवड वाढवणे.
- उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणे.
- राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे.
- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी इतर कोणावर अवलंबून राहू राहावे लागू नये म्हणून ही योजना सरकारने सुरू केलेली आहे.
- विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आत्मनिर्भर बनवणे हा राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना चा उद्देश आहे.
- पैसा अभावी कुठल्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचे फायदे
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Scholarship Benefits
- या योजनेच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण शुल्काची 50 ते 100% परत मिळते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबावरील आर्थिक भार कमी करण्यास मदत होते त्यांना अधिक शिक्षणावर लक्ष केंद्रित करता येते.
- या योजनेच्या माध्यमातून मदत होत असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत होत आहे.
- ही शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थी शिक्षण शुल्काची चिंता न करता शिक्षण पूर्ण करू शकतात.
- Chhatrapati Shahu Maharaj Scholarship योजनेच्या माध्यमातून राज्यात समानता निर्माण करणे हा सरकारचा उद्देश आहे.
- समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे समान संधी उपलब्ध करून देणे साठी सरकार प्रयत्न करत आहे.
- Rajshree Shahu Maharaj Scholarship योजनेच्या माध्यमातून मदत करून मागासवर्गीय आणि गरीब घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
- या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन नोकरी किंवा स्वतःचा उद्योग सुरू करून स्वतःच्या पायावर उभा राहून आत्मनिर्भर होऊ शकतो.
- राज्यातील शिक्षणातील गळती कमी करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरताना दिसत आहे.
- या योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची आवड निर्माण होईल. याबरोबरच राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढण्यासाठी ही मदत होईल.
- या योजनेमुळे विद्यार्थ्यांचा सामाजिक आर्थिक विकास होण्यास मदत होईल